ना. पंकजाताई मुंडे त्रिपुराच्या दौर्यावर ; बांबू हस्तकला प्रदर्शनाला दिली भेट

त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू
परळी लाईव्ह न्युज
महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तसेच शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशन अमलबजावणीचा निर्णय घेऊन तो प्रभावीपणे राबवू असं राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
ना. पंकजाताई मुंडे त्रिपुरा राज्याच्या दौर्यावर असून आज सकाळी त्यांचे आगरताळा विमानतळावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा तसेच शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.
आगरताळा येथील बांबू लागवड प्रदर्शनाला भेट देऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी महिलांच्या हस्तकला कौशल्याचे भरभरून कौतुक केले तसेच विविध जातीच्या बांबू लागवडीची यावेळी पाहणी केली.
त्रिपुरातील बांबू हस्तकला देशातील सर्वोत्तम हस्तकलेपैकी एक आहे तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्यांसाठी संपूर्ण देशाच्या गरजांपैकी बहुतांशी गरज या राज्यातून पूर्ण केली जाते. बांबू क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी, पीपीपी फ्रेमवर्क अंतर्गत, २००७ मध्ये त्रिपुरा बांबू मिशन (टीबीएम) सुरू करण्यात आले होते.
त्रिपुरा बांबू हस्तकला त्यांच्या उत्कृष्ट डिझाइन, विस्तृत श्रेणीतील उत्पादनांसाठी आणि कलात्मक आकर्षणासाठी देशातील सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रदर्शनात विविध जातीच्या बांबूच्या लागवडीचे आणि हस्तकला कौशल्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तसेच शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशनची अमलबजावणीचा निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं.