Visit Our Official Website Visit Now!

परळीत एखादा उद्योग आणण्यापेक्षा 100 नवउद्योजक घडविण्याचा भरत गित्तेंचा संकल्प | PLN UPDATE NEWS

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

परळीत अविस्मरणीय -ग्रेट अँड ग्रँड 'भरतभेट' !
परळीत एखादा उद्योग आणण्यापेक्षा 100 नवउद्योजक घडविण्याचा भरत गित्तेंचा संकल्प
परळीकरांनो, निराशा झटका ;आपलं रोल मॉडेल बदला- उद्योजक भरत गित्ते


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        स्वतःच्या कामाप्रती निष्ठावंत राहून प्रामाणिकपणाने ध्येय उराशी बाळगून यशाला गौसणी घालणे शक्य आहे. मात्र त्यासाठी निराशा झटकली पाहिजे. आपला दृष्टिकोन न्याय निवाडा करण्यापेक्षा सकारात्मक गोष्ट निवडण्यासाठीचा असावा. यातूनच कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. परळीकरांनो, निराशा झटका आणि आपलं रोल मॉडेल बदला- यश नक्कीच आहे. अशा प्रकारचा यशाचा कानमंत्र देत परळीत एखादा उद्योग आणण्यापेक्षा परळीतून शंभर नव उद्योजक घडविण्याचा आपला संकल्प असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त परळीचे भूमिपुत्र उद्योजक भरत गित्ते यांनी परळीकरांशी संवाद साधताना व्यक्त केला.

          तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भरत गित्ते या परळीच्या भूमीपुत्राचा परळीकरांच्या वतीने आज (१६ फेब्रुवारी) सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर परळीत प्रथमच आगळीवेगळी प्रेरणादायक प्रकट मुलाखत परळीकरांनी अनुभवली. केवळ सन्मानच नाही तर थेट अन् ग्रेट अशी भरतभेट आगळ्यावेगळ्या या समारंभात झाली. तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केलेल्या भरत गित्ते यांच्याशी परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व साहित्यिक प्रा.राजकुमार यल्लावाड यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधून सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दाखवले. परळीचा भूमीपुत्र असलेल्या उद्योजक भरत गित्ते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. हा क्षण प्रत्येक परळीकरासाठी उर अभिमानाचा ठरला. परळीच्या मातीची खरी गुणशक्ती यानिमित्ताने अधोरेखित झाली. परळीच्या गुणशक्तीत अधिकाधिक वाढ व्हावी, अनेकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने हा समारंभ अविस्मरणीय, ग्रेट आणि प्रेरक ठरला.

           या समारंभात प्रारंभी उद्योग जगतात तळपणार्या या परळीच्या ताऱ्याचा समस्त परळीकरांच्या वतीने शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रा.पवन मुंडे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व साहित्यिक प्रा. डाॅ. राजकुमार यल्लावाड यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून भरत गित्ते यांच्याशी आत्मिय संवाद साधून सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दाखवणारी मुलाखत घेतली. बालपणापासून ते जर्मनीपर्यंतचा प्रवास, मायभूमीची ओढ ते सातासमुद्रापार कर्तव्य व कर्तृत्व, शेतकरीपुत्र ते ॲल्युमनियम मॅनपर्यंतची वाटचाल, स्टार्टअप ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त उद्योजक , नवोदितांसाठी कानमंत्र ते परळीसाठी उपयुक्त बाबी अशा विविध आणि चौफेर मुद्द्यांवर या मुलाखतीच्या माध्यमातून भरत गित्ते यांनी भाष्य केले.

         काहीसा भावूक, काहीसा मनमोकळा पण सर्वांना प्रेरक व दिशादर्शक ठरणारा हा संवाद ठरला.परळी या आपल्या मायभूमीत होत असलेल्या या सन्मानाने भरत गित्ते भारावून गेले होते.अतिशय सुक्ष्म नियोजन, समारंभाच्या स्वरुपाप्रमाणे अभिरुप व्यासपीठ यामुळे हा समारंभ भव्यदिव्य व अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले.कार्यक्रमास परळीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी, पत्रकार, डाॅक्टर्स, सरस्वती शाळेचे आजी माजी शिक्षक, वर्गमित्र यांच्यासह सर्व स्तरातील परळीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate this article

Loading...

Post a Comment

Cookies Consent

This website uses cookies to ensure you get the best experience on our website.

Cookies Policy

We employ the use of cookies. By accessing Lantro UI, you agreed to use cookies in agreement with the Lantro UI's Privacy Policy.

Most interactive websites use cookies to let us retrieve the user’s details for each visit. Cookies are used by our website to enable the functionality of certain areas to make it easier for people visiting our website. Some of our affiliate/advertising partners may also use cookies.

Youtube Channel Image
CRYPTO WIZDOM Subscribe To watch more Blogging Tutorials
Subscribe